Posts

chaan ghosht

*एका गाढवाला* *झाडाला बांधले होते...* *एका रात्री भुताने...* *दोरी कापून गाढव सोडले...* *गाढवाने जाऊन...* *शेतातील पिके नष्ट केली...* *चिडलेल्या शेतकऱ्याच्या*  *बायकोने गाढवाला*  *दगड घालून ठार केले..* *गाढवाचा मालक...* *नुकसानीमुळे* *उध्वस्त झाला...* *प्रत्युत्तरादाखल त्याने...* *शेतकऱ्याच्या बायकोला..* *दगड घालून ठार केले...* *पत्नीच्या मृत्यूमुळे...* *संतप्त झालेल्या शेतकऱ्यांने...* *विळा घेऊन...* *गाढवाच्या मालकाची* *हत्या केली...* *गाढवाच्या मालकाच्या...* *पत्नीला राग आला...* *तिने आणि तिच्या मुलांने...* *शेतकऱ्याच्या घराला*  *आग लावली...* *शेतकऱ्याने*  *आपल्या घराची...* *राख बघून पुढे जाऊन...* *त्या गाढवाच्या मालकाच्या...* *बायकोला आणि मुलाला दोघांनाही ठार मारले...* *शेवटी जेव्हा शेतकऱ्याला...* *वाईट वाटले,* *तेव्हा तो...* *त्या भुताला म्हणाला...* *"तुझ्यामुळे हे सगळे मेले,* *असं का केलंस ?"* *त्या भूताने उत्तर दिलं...* *"मी कुणालाही*  *ठार मारले नाही.*  *मी फक्त...* *दोरीने बांधलेले* *गाढव सोडले..."* *तात्पर्य...*           ...

मुंबईचा इतिहास

व्हिक्टोरिया ,मुंबईची शान तसे पाहिले तर मुंबईचा इतिहास हा चार-पाचशे वर्षांचा. उत्तम सोयीचे एक नैसर्गिक बंदर एवढीच तिची ख्याती होती. उत्तरेतील शहरांसारखे प्राचीन ऐतिहासिक वैभव नसतानाही, एकाचवेळी भिन्न प्रकृती-संस्कृतीच्या, अठरापगड जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन, सुखनैव नांदणारे, व्यापारउद्योगधंद्याचे धाडसी नेतृत्व करणारे, सार्वजनिक हिताची कळकळ असणारे, शेजारधर्म जागवणारे, कलापारखी सुसंस्कृत बुद्धिमंतांचे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मागाल ते देणारे, जागेपणी स्वप्नपूर्ती करणारे जगाच्या पाठीवरील एकमेव शहर म्हणून मुंबई घडत गेली. या मुंबई शहराने स्वत:ची संस्कृती निर्माण केली. त्यातील वेगळे असे वैशिष्ट्य टिकवून आहे ती म्हणजे ‘व्हिक्टोरिया’ किंवा मुंबईची आबालवृद्धांची आवडती घोडागाडी! एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत मुंबईतील प्रवासी वाहतूक ही प्रामुख्याने रेकला (छकडा), बग्गी (टांगा) व पालखीतून तर मालवाहतूकही हातगाडीवरून होत असे. १८७२ सालच्या सरकारी नोंदीनुसार मुंबईत त्यावेळी परवानाधारक पाचशेपंचावन्न रेकले, चार हजार आठशेसोळा हातगाड्या व सातशेपंधरा टांगे किंवा बग्ग्या होत्या. एकोणिसाव्...

तानाजी मालुसरेंचा इतिहास-वारसा

तानाजी मालुसरेंचा इतिहास-वारसा !  छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य संस्थापिले ते तानाजी मालुसरे, मुरार बाजी, बाजीप्रभू देशपांडे यांच्यासारख्या नरवीरांच्या असीम शौर्याच्या बळावर. या रणवीरांच्या स्फूर्तीदायी कहाण्या आजही प्रत्येकाच्या अंगी वीरश्री चेतवितात. पण इतिहास लेखनामध्ये भावनिक अंगापेक्षा भर द्यावा लागतो सबळ पुराव्यांवर..शिवाजी महाराजांचे प्रमुख शिलेदार तानाजी मालुसरे यांच्या ११ पिढीपर्यंतचा इतिहास, तानाजी मालुसरे यांना शिवाजी महाराजांनी अर्पण केलेली कवडय़ांची माळ, मालुसरे घराण्याला किल्लेदारी बहाल केलेल्या पारगडाशी संबंधित अस्सल पत्रे असे पुरावे आता समोर आले आहेत. मालुसरे घराण्याच्या इतिहासाचा नाममात्र उल्लेख सेतुमाधवराव पगडी, डॉ. कमल गोखले यांनी आपल्या लेखनात केला आहे. मात्र इतर इतिहासकारांनी मालुसरे घराण्याकडील ऐतिहासिक साधनांकडे अद्याप ढुंकूनही बघितलेले नाही ही आपल्याकडील इतिहास लेखनाची शोकांतिका आहे. या ऐतिहासिक साधनांची योग्य चिकित्सा करून शिवचरित्रात नवी व मोलाची भर घालणे आवश्यक बनले आहे.‘गड आला पण सिंह गेला’, ‘आधी लगीन कोंडाण्याचे, मग रायबाचे’ अशी चमकदार वाक्ये त...

पुण्याचा इतिहास

पुण्याचा इतिहास... थोडक्यात. असे घडले पुणे... सन 754 : पुण्याचे नाव होते 'पुण्य-विजय' सन 993 : 'पुनवडी' हे पुण्याचे नाव पडले. सन:1600 मुळच्या वस्तीला 'कसबा पुणे' हे नाव होते. सन 1637 : पुणे शहाजीराजांच्या अंमलाखाली - सोमवार व रविवार पेठा वसवल्या गेल्या. सन 1656 : पुणे शिवाजी महाराजांचे अधिपत्याखाली होते. सन 1663 : मंगळवार पेठ वसली. सन 1703 : बुधवार पेठ वसली. सन 1714 : पुण्यावर पेशव्यांची सत्ता सुरू. सन 1721 : बाजीराव पेशवे यांचेकडून पुण्याची पुर्नबांधणी सुरू. सन : 1730 : शनिवारवाडा बांधून पूर्ण झाला. सन 1734 : पहिल्या बाजीरावाने शुक्रवार पेठ वसविली सन 1749 : पर्वती वरील देवालय बांधले. सन 1750 : वेताळ पेठ वसविली,कात्रज तलाव व वेशी बांधण्यात आल्या. सन 1755 : नागेश पेठ वसविली.पर्वती तळे बांधले. सन 1756 गणेश व नारायण पेठा वसविल्या. सन 1761 : लकडी पूल बांधण्यात आला. सन 1769 : सदाशिव व भवानी पेठा वसविल्या गेल्या. सन 1774 : नाना,रास्ता व घोरपडे पेठा वसविल्या. सन 1790 : फडणवीस वेस उभारण्यात आली. सन 1818 : इंग्रजी अंमल सुर...