chaan ghosht

*एका गाढवाला*
*झाडाला बांधले होते...*

*एका रात्री भुताने...*
*दोरी कापून गाढव सोडले...*

*गाढवाने जाऊन...*
*शेतातील पिके नष्ट केली...*

*चिडलेल्या शेतकऱ्याच्या* 
*बायकोने गाढवाला* 
*दगड घालून ठार केले..*

*गाढवाचा मालक...*
*नुकसानीमुळे*
*उध्वस्त झाला...*

*प्रत्युत्तरादाखल त्याने...*
*शेतकऱ्याच्या बायकोला..*
*दगड घालून ठार केले...*

*पत्नीच्या मृत्यूमुळे...*
*संतप्त झालेल्या शेतकऱ्यांने...*

*विळा घेऊन...*
*गाढवाच्या मालकाची*
*हत्या केली...*

*गाढवाच्या मालकाच्या...*
*पत्नीला राग आला...*

*तिने आणि तिच्या मुलांने...*
*शेतकऱ्याच्या घराला* 
*आग लावली...*

*शेतकऱ्याने* 
*आपल्या घराची...*
*राख बघून पुढे जाऊन...*

*त्या गाढवाच्या मालकाच्या...*
*बायकोला आणि मुलाला दोघांनाही ठार मारले...*

*शेवटी जेव्हा शेतकऱ्याला...*
*वाईट वाटले,*

*तेव्हा तो...*
*त्या भुताला म्हणाला...*

*"तुझ्यामुळे हे सगळे मेले,*

*असं का केलंस ?"*

*त्या भूताने उत्तर दिलं...*

*"मी कुणालाही* 
*ठार मारले नाही.*

 *मी फक्त...*
*दोरीने बांधलेले*
*गाढव सोडले..."*

*तात्पर्य...*
            
*आज माध्यमं...*
*भुतासारखी झाली आहेत...*

*ते दररोज गाढवं* 
*सोडत राहतात...*

*लोकं प्रतिक्रिया देतात आणि...*
*एकमेकांशी भांडतात,*
*एकमेकांना दुखावतात...*

*अगदी कसलाही* 
*विचार न करता...*

*सरतेशेवटी...*
*माध्यमांद्वारे...*
*सोडलेल्या...*
*प्रत्येक गाढवावर...*
*प्रतिक्रिया न देण्याची आणि...*

*आपले मित्र आणि...*
*नातेवाईक यांच्याशी...*
*असलेले आपले संबंध*
*जपण्याची जबाबदारी  आपली आहे.*
 
*माध्यमं,*
*चॅनल्स*
*तमाशा घडवून*
*आणतात,*
*पैसा कमावतात.*
*नुकसान आपले होते..!!!*

🙏🙏🙏

Comments